बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (16:42 IST)

तेलंगणा :लग्नास नकार दिल्याने 100 लोकांनी घरात घुसून तरुणीचं अपहरण

At Adibatla village in Ranga Reddy district of Telangana
शुक्रवारी 100 तरुणांच्या जमावाने हैदराबाद, तेलंगणा येथे एका घरात जबरदस्तीने प्रवेश करून एका 24 वर्षीय तरुणीचे लग्नास नकार दिल्याने अपहरण करण्यात आले. शुक्रवारी मुलीचे लग्न होणार होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुमारे तासभर शोध घेतल्यानंतर पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी कोडुदुला नवीन रेड्डी, रुबेन आणि इतर 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील आदिबाटला गावात एका तरुणीचे तिच्या घरातून अपहरण करण्यात आले. पीडित महिला दंत शस्त्रक्रियेची पदवीधर आहे. घरी सर्जन म्हणून काम करते. सुमारे 100 तरुण त्यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या मुलीला जबरदस्तीने घेऊन गेले, असा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. व्हिडिओमध्ये किमान 25 ते 30 लोक घराची तोडफोड करताना, कारच्या काचा फोडताना आणि एका व्यक्तीला लाठीने मारहाण करताना दिसत आहेत.
नवीन रेड्डी तरुणाने हे सर्व घडवून आणल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्नासाठी नवीन हा तरुणीवर दबाब टाकत होता. नवीनची तरुणीच्या घरासमोर चहाची  दुकान होती. अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. काही तासांच्या तपासानंतर पोलिसांनी मुलीची सुटका केली. पीडित तरुणी अजूनही घाबरलेली आहे. सध्या तिला काहीच बोलता येत नाही. मुख्य आरोपी नवीन अद्याप फरार आहे. इतरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
Edited by - Priya Dixit