मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (15:36 IST)

जितेंद्र आव्हाडांवर अनंत करमुसे प्रकरणावरून टीका करणाऱ्यांना त्यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं

jitendra awahad
‘हर हर महादेव’चा शो बंद पाडल्यानंतर तिथे झालेल्या गोंधळात एका प्रेक्षकाला आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी आव्हाडांना अटकही झाली. एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर २४ तासांच्या आत आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. एका कार्यक्रमातून परतत असताना गर्दीत आव्हाडांच्या समोर आलेल्या भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याला आव्हाडांनी हाताने बाजूला केलं. यावेळी आव्हाडांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार या महिला पदाधिकाऱ्याने दाखल केली. त्याविरोधात अटकपूर्व जामीनासाठी आव्हाडांनी न्यायालयाद दाद मागितली. आव्हाडांना तो जामीन मंजूरही करण्यात आला.

या सगळ्या गोंधळानंतर आता जितेंद्र आव्हाडांवर अनंत करमुसे प्रकरणावरून टीका करणाऱ्यांना त्यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्या माणसाने २०१६ ते २०२० या काळात माझा पाठलाग केला, ट्विटर-फेसबुकचा वापर करत बदनामी केली, ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला. टीका करणाऱ्यांनो, तुमच्या भावाचं, वडिलांचं किंवा तुमचं अशा प्रकारे नग्न छायाचित्र काढलं गेलं असतं किंवा इतकी वर्षं त्रास दिला गेला असता, तर आपण काय केलं असतं?”


असा सवाल आव्हाडांनी ट्वीटच्या माध्यमातून विचारला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor