सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (14:21 IST)

राज्यात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट!

अवघे दहा दिवस आता जून महिना संपायला उरले आहे. यावेळेस जून च्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 
महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळे आधीच मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये दाखल झाला आहे. पावसाच्या जोरदार सरी झाल्यानंतर मागील काही दिवस पाऊस थांबला होता. म्हणून पाऊस थांबल्या करणारे पेरण्या देखील थांबल्या होत्या. 
 
आता काल पासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी ठाणे सह पुण्यामध्ये बरसत आहे. हवामान खात्याने पावसाची हीच स्थिती कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
पुणे, मुंबई, ठाणे, पालघर तसेच कोकणात येत्या तीन ते चार तासांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच उत्तर आहारष्ट्र, मराठवाडा, विदर्भ याठिकाणी देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही जिल्ह्यांना यलो अलर्ट घोषित केला आहे.