मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 4 जानेवारी 2022 (17:43 IST)

राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट

सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. येत्या काही दिवसात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी सुरु आहे. उत्तर भारताच्या काही भागात कडाक्याची थंडी सह बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे थंडीचा जोर वाढणार आहे. येत्या चार दिवसात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.
देशाच्या काही भागात जम्मू- काश्मीर, राजस्थान, पंजाब, हरियाणा, लडाख, उत्तराखंड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काही भागात  हवामान खात्यानं यलो अलर्ट सांगितले आहे. 
 राज्यात 6 ते 8 जानेवरी च्या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची स्थिती बनणार आहे. उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विदर्भ  उत्तर कोकणातील काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील बुलढाणा, अमरावती, वर्धा, अकोला, नागपुरात यलो अलर्ट सांगण्यात आले आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
पंजाब, पश्चिमी मध्यप्रदेश, पूर्वी उत्तर प्रदेश पूर्व मध्यप्रदेश, राजस्थान येथे गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.