1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2023 (20:45 IST)

राज्यात मुसळधार पाऊस; सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

eknath shinde
Heavy rains in the state Chief Minister Eknath Shinde राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ते आज अधिवेशनाच्य़ा तिसऱ्या दिवसानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
 
पुढे बोलताना ते म्हणाले “नागरिकांनी आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे.  सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच संभाव्य पूरग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सूचना दिल्या गेल्या आहेत. तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करण्य़ाचे निर्देशही दिले आहेत” असे ते म्हणाले.
 
पुढे बोलताना त्यांनी एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात असून मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.