मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मे 2020 (18:20 IST)

घरपोच दारु विक्रीसाठी राज्य सरकारने सशर्त संमती दिली

Home delivery of liquor allowed in Maharashtra. Mumbai
मद्यविक्रीची होम डिलिव्हरी करण्यास महाराष्ट्र सरकारने सशर्त संमती दिली आहे. लॉकडाउनच्या तिसर्‍या टप्प्यात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ३ मेनंतर काही सेवा सुरु करण्यात आल्या. ज्यामध्ये मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकानं उघडण्याची सशर्त संमती देण्यात आली. मात्र दुकानांवर गर्दी होऊ लागल्याने आणि अटींचं उल्लंघन होऊ लागल्याने राज्यातील मुंबई, पुणेसह अनेक शहरांमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली. आता राज्य शासनाने मद्याची घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी परवानगी दिली आहे.
 
१४ तारखेपासून मद्याची घरपोच सेवा देण्यास सुरुवात होईल तसेच फक्त परवाना असणाऱ्या मद्य दुकानांना ही सेवा देता येणार आहे. सोबतच ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाच ही सेवा घेता येणार आहे. तसंच घरपोच सेवा देण्याची जबाबदारी मद्य दुकानाच्या मालकावर असणार आहे. 
 
डिलिव्हरी बॉयला ओळखपत्र दिलं जाणार तसंच त्याची वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार आहे. कंटेनमेंट तसंच रेड झोनमध्ये ही सेवा मिळणार नाही. तसेच ज्या जिल्ह्यात दुकानं उघडी आहेत तिथेच ही सेवा लागू होणार आहे.