संबंधित माहिती
- अत्यावश्यक सेवेसाठी राज्यात ३ लाख १० हजार पास वाटप : गृहमंत्री अनिल देशमुख
- राज्यात आज ५८३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १० हजार ४९८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- शाहरुख खानने केली 25 हजार PPE किट्सची मदत, आरोग्य मंत्र्यांनी मानले आभार
- काय म्हणता, फॅन्सी नंबरप्लेटमुळे चक्क १० हजार दंड
- काश्मीरमध्ये उद्योगांचं 10 हजार कोटींचं नुकसान
मुंबई पोलिसांसाठी स्टार इंडिया, प्रोजेक्ट मुंबईकडून १० हजार पीपीई कीट
कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षमतेने उभे आहे. त्यांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे, स्टार इंडिया, डिस्ने व हॉटस्टारचे चेअरमन उदय शंकर आणि प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, शिशिर जोशी यांनी १० हजार खाकी रंगाचे पीपीई कीट भेट दिले.
कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी निश्चितच पोलीस विभागाला हे कीट अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच आतापर्यंत मिळालेली ही सर्वात मोठी भेट असून त्यांनी या भेटीबद्दल स्टार इंडिया व प्रोजेक्ट मुंबईचे गृह विभागाच्या वतीने आभार व्यक्त केले.
