मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 12 मे 2020 (09:06 IST)

कोरोनाचे १२३० नवीन रुग्ण; राज्यात एकूण २३ हजार ४०१ रुग्ण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१ झाली आहे. आज १२३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५८७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४७८६ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १८ हजार ९१४ नमुन्यांपैकी १ लाख ९३ हजार ४५७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २३ हजार ४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. (प्रयोगशाळा नमुन्यांचे आकडे आय सी एम आर पोर्टलप्रमाणे अद्ययावत करण्यात आले आहेत.)
 
राज्यात २ लाख ४८ हजार ३०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार १९२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात ३६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २०, सोलापूर शहरात ५, पुण्यात ३, ठाणे शहरात २, अमरावती जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, नांदेड शहरात १, रत्नागिरी मध्ये १ तर वर्धा जिल्ह्यात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे. 
 
झालेल्या मृत्यूंपैकी २३ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.