Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Accident in jodhpur जोधपूरमध्ये भीषण रस्ता अपघात

Updated: शनिवार, 7 जानेवारी 2023 (11:19 IST)
 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस जोधपूरहून ओसियान (चाडी)कडे जात होती. यादरम्यान जोधपूर-मथानिया मार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकला त्यांची जोरदार धडक झाली. अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच स्थानिकांनी प्रथम घटनास्थळ गाठून बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. लोकांच्या माहितीवरून स्थानिक पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना तात्काळ जोधपूरच्या मथुरादास माथूर रुग्णालयात खाजगी वाहनाने नेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर दोन्ही वाहनांच्या केबिनमध्ये बसलेले लोक चांगलेच अडकले होते. मोठ्या कष्टाने त्यांना बाहेर काढले.
 
 सीएम गेहलोत एमडीएम हॉस्पिटलमध्ये पोहोचले
घटनेची माहिती मिळताच जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता आणि माजी डीसीपी अमृता दुहान हेही घटनास्थळी पोहोचले. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ओसियाचे आमदार दिव्या मदेरणा, माजी संसदीय सचिव आणि ओसियाचे आमदार भैराराम सोल यांनीही मथुरादास माथूर रुग्णालयात पोहोचून जखमींची काळजी घेतली. दरम्यान, जोधपूरला पोहोचलेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही आपले इतर कार्यक्रम रद्द करून रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली. अपघातग्रस्तांवर तातडीने योग्य उपचार करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.
 
 42 लाख रुपयांची मदत मंजूर
त्यानंतर मृत आणि जखमींसाठी तातडीने मदत पॅकेज जाहीर करण्यात आले. याअंतर्गत मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना 42 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. यामध्ये पाच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि 32 जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर चिरंजीवी विमा योजनेंतर्गत मृतांच्या नातेवाईकांना 5-५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: ठाण्यात लवकरच प्रीपेड ऑटो सेवा सुरू होणार

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ज्येष्ठ नेते शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले

अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उप-वर्गीकरणाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये एल्गार महा मोर्चा,हजारो आंदोलक रस्त्यावर

ठाण्यात लवकरच प्रीपेड ऑटो सेवा सुरू होणार

पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका तरुणीची सहकारी तरुणांनी केली फसवणूक, गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments