शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (14:23 IST)

HSC Result: बारावीचा निकाल जाहीर; कुठे पाहाल निकाल?

HSC Result: Twelfth result announced; Where do you see the results? Maharashtra News Regional Marathi News IN Marathi Webdunia Marathi
बारावीचा निकाल जाहीर झाला असून निकालाची टक्केवारी 99.63 टक्के आहे. विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
विज्ञान शाखेचा निकाल 99.45, कला शाखेचा निकाल 99.83 तर वाणिज्य शाखेचा निकाल 99.91 लागला आहे.
46 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. मुलांचा निकाल 99. 54 टक्के तर मुलींचा निकाल 99.73 टक्के लागला आहे. 35 टक्के गुण असेलेले 12 विद्यार्थी आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 साठीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, "सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत 12वी निकालासाठी सुधारित अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत परीक्षा मंडळांचा मोठा वाटा असून त्यात शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली. ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि सहकार्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते!"
 
'या' वेबसाइट्सवर पाहता येईल निकाल
https://msbshse.co.in
https://hscresult.11thadmission.org.in
http://hscresult.mkcl.org
http://mahresult.nic.in
या चार वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती.
 
खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व शिक्षण मंडळांना 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करायचा होता. पण महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती आल्याने निकाल प्रक्रिया रखडली होती. अखेर निकाल आज जाहीर होणार आहे.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
 
मूल्यमापनाचा तपशील
एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सीबीएसई बोर्डाप्रमाणे 30:30:40 फॉर्म्युल्यानुसार होणार आहे.
दहावीचे 30% गुण, अकरावीचे 30% गुण आणि बारावीच्या वर्षभरात झालेल्या परीक्षांचे 40% गुण या आधारावर एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल घोषित केला जाईल.
11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%)
12वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%)
दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%)