गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (13:45 IST)

शरद पवार थोड्याच वेळात अमित शहा यांची भेट घेतील

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस इतर विरोधी नेत्यांना केंद्र सरकारच्या विरोधात एकत्र करण्याचा प्रयत्न करत असताना, राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमधील नियमित बैठका अनेक प्रश्न उपस्थित करतात.
पवार आणि शहा यांची भेट आज दुपारी 2 वाजता होणार आहे.ही भेट सहकाराच्या मुद्द्यावरून होत असल्याचे समजले आहे.या पूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती.