गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2024 (09:24 IST)

पतीनेच केले पत्नीचे अपहरण, केस नोंदवून घेत नाही म्हणून पोलिसांवर आरोप

महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड मध्ये एका पतीनेच पत्नीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला जबरदस्ती कार मध्ये नेताना व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. तसेच महिलेने आरोप केला आहे की, पोलीस केस नोंदवून घेण्यास तयार नाही. पिंपरी चिंचवडमधील ही घटना आहे. एका महिलेचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्ता दुसरा तिसरा कोणीही नसून तिचाच पती आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार पीडित आणि तिच्या पतीचा विवाह दीड वर्षांपूर्वी झाला होता. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत होते. वादांमुळे त्रस्त महिला पुण्यामधील आपल्या काकांच्या घरी राहू लागली. तसेच नातेवाईकांनी समजवल्यानंतर ती पुन्हा सासरी एकाहु लागली. तरी देखील दोघांमध्ये भांडण मिटले नाही तसेच ते अधिक व्हायला लागले. यानंतर ती अनेक महिने दिल्ली आणि मुंबई मध्ये राहू लागली. 
 
तसेच या महिलेने नोकरी करण्यास सुरवात केली आणि पेइंग गेस्ट हाउसमध्ये राहू लागली. त्यानंतर पतीने तिचा पत्ता शोधून तिला घरी येण्यास सांगितले पण तिने नकार दिला त्यानंतर पतीने तिचे अपहरण केले नंतर काही अंतरावर गेल्यानंतर तिने स्थानिक लोकांना मदत मागितली. तसेच महिलेने या घटनेची तक्रार पोलीस स्टेशमध्ये घेतली पण पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. असे या महिलेने आरोप केले आहे.