गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 एप्रिल 2021 (14:36 IST)

मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे, पंकजा ताईंसाठी धनंजय मुंडेंचं भावनिक ट्वीट

I am with you as an elder brother
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्या विलगीकरणात आहेत. पंकजा मुंडे यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करत आपल्याला करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे. पंकजा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी कळताच राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी 'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच' असं भावनिक ट्वीट केलं आहे.
 
धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून म्हटलं की 'ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केला आहे. यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या, ताई' अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
 
आज सकाळी पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. माझ्या कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांनी खबरदारी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले आहे.