1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , गुरूवार, 29 एप्रिल 2021 (11:45 IST)

आता नागपुरातही रेल्वे कोचमध्ये कोविड सेंटर

Covid Center
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही आता रेल्वे कोचमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. नागपुरात दरदिवशी 100 हून अधिक मृत्यू् आणि 6 ते 7 हजार नवीन रूग्णांची वाढ होत आहे. अशा बिकट परिस्थितीमुळे नागपुरात रूग्णांना बेड मिळेनासे झाले आहे.

कोरोनाची परिस्थिती अजूनही आटोक्यात येत नसल्याने आरोग्य यंत्रणा कोलडून पडली आहे. त्यातच आता कोरोना रुग्णांना भरती करून घेण्यासाठी रुग्णालयामध्ये जागा शिल्लक नाही. त्यामुळेच कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे.