बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (15:32 IST)

असा विरोधीपक्ष मी आजवर कधी पाहिला नाही,फडणवीस यांचा टोमणा

fadnavis uddhav
हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सत्तार यांची पाठराखण केली. तर विरोधी पक्षावर निशाणाही साधला. स्वतःच्याच काळातील घोटाळ्यांचे आरोप उकरून काढणारा असा पहिलाच विरोधी पक्ष पाहिल्याचं फडणवीस म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. स्वतःच्याच काळातील घोटाळ्यांचे आरोप करणारा असा विरोधीपक्ष मी आजवर कधी पाहिला नाही, असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
 
राज्यात टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
 
फडणवीस म्हणाले, राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा घोटाळा मविआ सरकारच्या काळात झाला. यात सनदी अधिकाऱ्यांपासून अनेक लोक घोटाळ्यात लिप्त होते.. मंत्रालयातले अधिकारीही या प्रकरणी अटक झाले. अब्दुल सत्तारांच्या कोणत्याही मुलीला टीईटी अंतर्गत नोकरी लागलेली नाही.
 
Edited by - Ratnadeep Ranshoor