1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 28 डिसेंबर 2022 (15:31 IST)

सुप्रिया ताई म्हणाल्या, ‘कुंकू आता छान दिसतंय, रोज कुंकू लावत जा

supriya sule
बारामती लोकसभा मतदारसंघातील वरवंड येथील ज्येष्ठ नेते रामदासनाना दिवेकर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या कुटुंबीयांचं सात्वंन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी रामदासनाना दिवेकर यांच्या पत्नीच्या मीनाताईंच्या कपाळावर कुंकू लावलं. तसंच, तिथे उपस्थित असलेल्या महिलांनाही त्यांच्या कपाळावर कुंकू लावण्यास प्रोत्साहन दिलं.
 
पतीचं निधन झाल्यानंतर पत्नीने कुंकू लावू नये अशी प्रथा पाळली जाते. या प्रथेला मुठमाती देत सुप्रिया सुळे यांनी याआधीही एका महिलेच्या कपाळी कुंकू लावलं होतं. तेव्हाही त्यांच्या या कृतीचं कौतुक करण्यात आलं होतं. आता पुन्हा त्यांनी मीनाताई दिवेकर यांच्या कपाळावर कुंकू लावून, ‘कुंकू आता छान दिसतंय. रोज कुंकू लावत जा,’ असा सल्ला दिला.
 
Edited by - Ratnadeep Ranshoor