बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (09:03 IST)

सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल, पण त्यांचा अपमान थांबवा-देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
संतांना जातीपातीच्या राजकारणात का अडकवता? महापुरुषांबाबत बोलताना परबांनी सावरकरांचा एकदाही उल्लेख केला नाही. संताचा अपमान काहीजण करतात ते चुकीचं नाही का? वारकऱ्यांवरील सुषमा अंधारेंच्या विधानावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले .राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात पण तुम्ही काही बोलत नाही. राहुल गांधी सावरकरांना माफीवर म्हणतात आणि त्यांच्यासोबतच फिरता.सावरकरांच्या अपमानाबद्दल का बोलत नाही? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआ नेत्यांना केला. सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल पण त्यांचा अपमान थांबवा, असेही ते म्हणाले.
 
संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, संजय राऊत महाराजांचा उल्लेख शिवाजी म्हणून करतात. राऊत बाबासाहेबांच जन्मस्थळ चुकीचं सांगतात असेही ते म्हणाले. महापुरुषांच्या वक्तव्यावरून गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं होत. आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात निवेदन देत असताना काही सवाल उपस्थित करताच सभागृहात गोंधळाच वातावरण तयार झालं.

Edited By -Ratnadeep Ranshoor