शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जुलै 2022 (08:12 IST)

आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही-शालिनी ठाकरे

Shalini Thackeray
शिवसेनेला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. शिवसैनिकांशी वैयक्तिक पातळीवर जाऊन संपर्क साधत पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी 'निष्ठा यात्रे'ची घोषणा केली आहे. दरम्यान, यावरून आता मनसेनं शिवसेनेला डिवचलं आहे.
 
"आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाणा आहे. पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत आहेत.....!!! आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही. समय समय की बात है," असं म्हणत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टोला लगावला.