शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जुलै 2022 (08:08 IST)

स्मशानभुमीचे शेड पेटत्या मृतदेहावर पडले, पुसद तालुक्यातील जमशेदपुर येथील घटना

पुसद तालुक्यातील जमशेदपूर येथे स्मशानभूमीचे शेड पेटत्या मृतदेहावर अचानक कोसळल्याने गावकऱ्यानी संताप व्यक्त केला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. जमशेदपुर येथील रहिवासी मधुकर शामा आडे यांच्यावर अंतविधी सुरू असताना ही घटना घडली.
 

मृतदेहास अग्नी दिल्यानंतर दहनशेडच्या बाहेर गावकरी उपस्थित होते. त्यावेळी अचानक दहनशेड चा संपूर्ण स्लॅब मृतदेहावर पडला. पुसद पंचायत समिती अंतर्गत निंबी नंतर जमशेदपुरची दहनशेड पडण्याची दुसरी घटना आहे.