शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (16:46 IST)

भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्याकडून गावजेवण देईल : चंद्रकांत पाटील

देगलूर -बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला आघाडी द्या, मी तुम्हाला गाव जेवण देईल अशी खुली ऑफर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. भाजपकडून देगलूर पोटनिवडणुकीसाठी सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील स्वतः प्रचारासाठी देगलूरमध्ये तळ ठोकून आहेत.
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपची सत्ता आणण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना खुली ऑफर दिली आहे. यापुर्वी सांगली महानगरपालिकेच्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला शॉक दिल्यास सोन्याचा मुकुट घालेन अशी ऑफर दिली होती. तर आता देगलूरमध्ये भाजपला आघाडी दिल्यास मी तुम्हाला गाव जेण देईन अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 
 
देलगूरमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते यावेळी ते म्हणाले की, भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्याकडून गावजेवण देईल. या गावजेवणमध्ये मी स्वतः सहभागी होणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.