बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (16:07 IST)

आता बोला ! शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज उसाच्या फडात आढळले, नांदेड मधील प्रकार, मदत मिळणार तरी कशी ?

नैसर्गिक संकटामुळे शेतकरींना पिकेची नुकसान भरपाई राज्य शासना कडून जाहीर केली आहे. शेतकरी  बांधवाना नैसर्गिक संकटामुळे जगणे अवघड झाले आहे. पीक विमच्याची मदत खात्यावर जमा झाली की नाही या साठी शेतकरी चौकशी करत आहे. तलाठी अधिकारी कृषी अधिकाऱ्यांना विचारत आहे. शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून अर्जात चूक झाल्यास विम्याचे परतावे परत मिळणार नाही अशी समज शेतकऱ्यांना दिली जात असताना  विम्या कम्पनीचे कारभार उघडकीस आले आहे. शेतकऱ्यांचे विमा अर्ज विमा कंपनी पर्यंत पोहोचले नाही. शेतकऱ्याचे पीक विम्याचे अर्ज जे विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे जमा केले होते, ते अर्ज उसाच्या फडात सापडले हे अर्ज 50 -100  नसून तब्बल 500 आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली त्यांची चेष्टा केली जात आहे.हा प्रकार नांदेड मध्ये घडला आहे. 
 
हा प्रकार उघडकीस आला आहे आंतरगावच्या शेतकरी किसान बाबाराव शिंदे यांच्यामुळे हे आपल्या शेतामध्ये उसाची पीक पाहणीसाठी गेले असता त्यांना उसाच्या फडात कागदाचा गठ्ठा दिसला त्यांनी ये काय कागदपत्रे आहे ,बघता त्यांना सर्व पिकविम्याचे अर्ज असल्याचे लक्षात आले . हे तेच अर्ज होते जे त्यांनी आठ दिवसापूर्वी विमा कंपनीच्या प्रतिनिधी कडे दिले होते. त्यांनी हा प्रकार इतर शेतकरींना सांगितला संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे  जिल्ह्याचे कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आता शेतकऱ्यांचा पिकविम्याचा अर्जच विमा कंपन्यांकडे पोहोचणार नाही तर त्यांना नुकसानाची भरपाई कुठून मिळेल. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.