मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (16:20 IST)

आपण ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बापाला घाबरत नसतो : शशिकांत शिंदे

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही नेत्यांवर ईडीकडून कारवाई सुरु आहे. याबाबत आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी ईडीला आव्हान देताना आपण ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बापाला घाबरत नसतो, असे म्हटले आहे. 
 
भाजपच्या ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जरंडेश्वर कारखान्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले म्हणून आम्ही शांत बसलो आहोत. नाहीतर किरीट सोमय्या यांना चांगला इंगा दाखवला असता. त्यांचे बोलणे सर्व बाहेर काढले असते. आपण पुढील परिणामांचा विचार करत नाही. मी ईडी  आणि इन्कम टॅक्सच्या बापाला घाबरत नाही, असे सांगत आव्हान दिले. आमदार शशिकांत शिंदे यांनी कटापूर येथे त्यांनी हे आव्हान दिले.
 
ईडीला  पळवणारे आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत. ईडी आणि ईडीच्या बापालाही आम्ही घाबरत नाही, काही दिवसांपूर्वी भाजपचे सोमय्या कोरेगाव परिसरात येऊन गेले. ते काय बोलतात ते त्यांनाच माहित. ईडी काय, ईडीच्या बापालाही आम्ही घाबरत नाही, असा थेट इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी  दिला. वाढदिवसानिमित्त कटापूर (ता. कोरेगाव) येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कोरेगाव मतदारसंघ राष्ट्रवादीच्यावतीने आदर्श कोरोना योद्धा व आदर्श आमदार म्हणून पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.