बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (22:03 IST)

मी कोणासमोर पदर पसरून काही मागणार नाही,

pankaja munde
पंकजा मुंडे यांनी विधानसभेबाबत मोठं विधान केलं आहे. 2024 साली विधानसभेला पक्षाने तिकीट दिलं तर तयारीला लागणार आहे. मला कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचे नाही. मी कोणासमोर पदर पसरून काही मागणार नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे सडेतोड भाषण केलं आहे.

“माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे. एवढे दिवस मी कधीच यावर बोलले नाही, मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी हा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील, आपण २०२४ च्या तयारीला लागलं पाहिजे,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

“गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आपल्यासमोर…”
“काळात प्रवाहाविरोधात ज्या पक्षात कुणीच जात नव्हतं, त्या पक्षात गोपीनाथ मुंडे कमळाचं फुल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले. त्यांचा संघर्ष कमी झाला का? ४० वर्षांच्या राजकारणात केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. हा संघर्ष कमी आहे का? त्या गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आपल्यासमोर आहे,” असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

Edited by : Ratnadeep Ranshoor