मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (08:41 IST)

सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरहल्ला चढवत आहेत. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनाही पत्र लिहिले होते.त्यामुळे संजय राऊत यांनी सव्वा रुपयाचा दावा दाखल केला आहे.त्यांच्यावर सव्वा रुपयाचा दावा लावलाय आणि मी कोणताही दावा हरत नाही हे विसरू नका. त्यांच्याकडून सव्वा रुपया घेतल्या शिवाय राहणार नाही,असं राऊत यांनी सांगितलं.
पुण्यातील वडगाव शेरी  येथे संजय राऊत यांच्या उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.संजय राऊत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात चंपा चंपा अशा घोषणा दिल्या.

यावर राऊत म्हणाले, मी कशाला त्यांना चंपा म्हणू ? ते माझे चांगले राजकीय मित्र आहेत.ते माजी म्हणू नका, असं म्हणत असतील तर भावी म्हणू. त्यांची आणि माझी चांगली मैत्री आहे.पण मी त्यांच्यावर सव्वा रुपयाचा दावा लावला असून मी कोणताही दावा हरत नाही हे विसरु नका.त्यांच्याकडून सव्वा रुपया घेतल्या शिवाय राहणार नाही. मी कोणताही खटला हरत नाही.दोन वर्षापूर्वी तुम्हाला हरवून दाखवलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला आहे,असे म्हणत राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला लगावला.