मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (08:16 IST)

भाजपची संस्कृती या ऑडिओ क्लिप मधून पुन्हा दिसली आहे

महिला अधिकाऱ्यांशी अशा भाषेत बोलणे योग्य नाहीच, भाजप कडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. आता पुन्हा एकदा भाजप संस्कृती क्लिपमधून दिसली आहे,अशा शब्दांत महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी हल्लाबोल केला.
 
यापूर्वी भाजपच्या महिला नगरसेविकेच्या पतीची अशाच प्रकारे ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.ठेकेदारासाठी महिलांना शिवीगाळ करणारे भाजपचे पदाधिकारी जनतेच्या हितासाठी काही करत नाहीत.या अगोदर सुध्दा कोरोनाच्या काळात महिला आरोग्य अधिकारी यांना एका भाजप नगरसेवकाने अश्लील शिवीगाळ दिली होती.
 
त्याप्रमाणे राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेत्याने महिला कलावंताविषयी असभ्य भाषा वापरली होती.अशी अनेक उदाहरणे देता येतील, परंतु भाजपाच्या पदाधिकाऱ्यां मध्ये कुठलीही सुधारणा होत नाही,ही भाजपची संस्कृतीच आहे मी भाजप च्या विचारांचा निषेध व्यक्त करते, असेही दीपाली धुमाळ यांनी सांगितले.