गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (22:06 IST)

तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या, राज यांचे ट्विट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाच्या उमेदवारांचं अभिनंदन केलं असून लवकर भेटण्यासाठी येणार असल्याचं म्हटलं आहे. “ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या,” असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३६ जागी विजय मिळविला आहे.