मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:32 IST)

राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आली तर मुख्यमंत्री हे होतील - जयंत पाटील

Jayant Patil
या निवडणुकीनंतर सत्तेत महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार हे संख्याबळावर ठरेल. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद आलं तर मुख्यमंत्री कोण होणार हे पवार साहेबच ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असे, अस वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
 
महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आलं तर मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटलांनी उत्तर दिले.राज्यात आगामी काळात होणारी निवडणूक आणि त्या अनुषंगाने विविध विषयांवर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं कौतुक करताना ते म्हणाले की, माझी आणि राज ठाकरेंची फारशी ओळख नाही.मी त्यांना फक्त टीव्हीवर बघतो.पण त्यांनी माझी मिमिक्री चांगली केली होती.त्यांची भाषणंही चांगली असतात.
Edited by : Ratnadeep Ranshoor