सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 एप्रिल 2023 (08:05 IST)

भाजप आणि मिंध्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आमच्या वज्रमुठीचा सामना करावा; उद्धव ठाकरे यांचे आव्हान

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यातील सावा मैदानावर विराट सभा झाली. या सभेला जनतेचा महासागर उसळला होता. या सभेत  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंध्याचा चांगलाच समाचार घेतला. भाजप आणि मिंध्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आमच्या वज्रमुठीचा सामना करून दाखवावा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी या सभेत दिले.
 
या सभेत दिसणारी गर्दी ही फक्त जल्लोष असायला नको, गद्दारांना गाडायचे आहे, असा निर्धार करा. गद्दारीमुळे महाराष्ट्राला कलंक लागला आहे. तो कलंक आपल्याला मिटवायचा आहेत. तसेच गद्दारी करणारे हातही गाडायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र शूरांचा आणि विरांचा आहे. हा गद्दारांचा नाही. तुम्ही शेतातले तण काढता, तसे गद्दारांना या जळगावच्या सुवर्णभूमीतून उखडून फेका, असे आवाहन त्यांनी केले.
 
आमचा चोरलेला धनुष्य, चोरलेले पक्षाचे नाव आणि मोदी यांचा फोटो घेऊन या, मी माझे नाव घेत मैदानात उतरतो, बघूया जनता कोणाच्या बाजूने आहे, ते समजेल. आगामी निवडणुका तुम्ही मिंध्यांच्या नेतृत्वाखाली लढणार का, असा सवालही त्यांनी भाजपला केला. फक्त 48 जागा भाजप मिंध्यांना देणार आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही लढणार का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.
 
अशी झाली पाचोऱ्यात सभा –
आता समोर कोणीही आले तरी त्यांचा फडशा पाडल्याशिवाय आपण थांबत नाही. सभेत घुसण्याची वल्गना करणारे आलेले नाही, येण्याची हिंमत नाही त्यांच्यामध्ये भाजप आणि मिंध्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी वज्रमुठीचा सामना करून दाखवावा. ही गर्दी फक्त जल्लोष असायला नको, गद्दारांना गाडायचे आहे, हा निर्धार करा.
महाराष्ट्र शूरांचा आणि वीरांचा आहे, गद्दारांचा नाही, शेतातले तण उखडता तसे गद्दारांना अखडून फेकाआमचे चोरलेले धनुष्य आणि मोदींचे नाव घेऊन या, मी माझे नाव घेऊन येतो, बघूया जनता कोणासोबत आहे भाजप मिंधे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे का? खासघरमध्ये जो कार्यक्रम घेतला, तो फक्त मतदार डोळ्यासमोर ठेवतच झाला. गद्दारांच्या हातात भगवा शोभून दिसत नाही, ही चोरट्यांची आणि भामट्यांची औलाद आहे निवडणुकांसाठी त्यांनी पुलवामा आणि जवानांचे बळी घेतले, हे मान्य आहे काय हे असे हिंदुत्व आपल्याला मान्य आहे काय आजही रोशनी शिंदे यांची तक्रार घेतलेली नाही, त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले आहेत. महिलांना माराहण करणारे विकृत हिंदुत्व आम्हला मान्य नाही.महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यानंतर महिलांची तक्रारही घेतली जात नाही. त्यांच्यावरच तक्रारी दाखल होतात. महाराष्ट्रात गोहत्या बंदी आहे, गोव्यात नाही. हे कसला न्याय, हे कसले हिंदुत्व. आम्ही हिंदुत्व सोडले नाही, सोडणार नाही, आमचे हिंदुत्व राष्ट्रीय़त्व आहे, त्यांचे हिंदुत्व काय आहे, ते सांगा. आम्ही कोणत्याही धर्मावर अन्याय केला नाही. कोरोना काळात मंदिरे उघडण्यासाठी त्यांचा घोडा होता. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असे म्हणातात, एक उदाहरण तरी दाखवा. सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबित आहे, न्यायदेवता आपल्याला न्याय देईल, ही अपेक्षा आहे.,
त्यासाठी घराण्याचा वारसा लागतो. तो वैशालीताई यांच्यामागे आहे. तुम्हाला आगा ना पिछा तुम्ही जोळी घेऊन माझ्या जनतेच्या हाती भिकेचा कटोरा देऊन निघून जाल. मी घरी बसून जे काम केले, ते काम हे वणवण फिरूनही करू शकत नाही. शेतकरी मेहनत करतो, तो श्रीमंत होत नाही पण पंतप्रधानांचा मित्र जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतो कसा आव्हान स्विकारायला मर्दपणा लागतो, तो त्यांच्यात नाही.
टाका आम्हा सगळ्यांना जेलमध्ये टाका, एकदा जेलभरो होऊ द्या जे भाजपमध्ये गेले नाहीत, जे आपल्यासोबत राहिले आहेत, त्यांच्यामागे ईडी, सीबीआय चा ससेमिरा लावला आहे.
सगळेच गुलाबो गँगसारखे नसतात, काही मर्द असतात. भाजपला स्वतःच्या पक्षातील चांगले लोक नको आहेत, इतर पक्षातील भ्रष्ट त्यांना चालतात
 
Edited By- Ratnadeep Ranshoor