1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (09:01 IST)

वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू : विजय वडेट्टीवार

सर्व जण शक्ती दाखवत आहेत, वेळप्रसंगी ओबीसींचीही शक्ती दाखवू. वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू, असा इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिला आहे. नागपुरात ते बोलत होते. 
 
ओबीसींचा एल्गार दिसायलाच हवा, एक लाख पदांचा ओबीसींचा बॅकलॅाग आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, मराठा समाजाच्या जागा वेगळ्या ठेवून सर्व भरती होणार आहे. ओबीसींच्या प्रश्नासाठी विभागीय मेळावे घेणार आहे, असा इशारा देत ओबीसींच्या मुद्द्यावर कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार पुन्हा आक्रमक झाले आहेत.
 
ओबीसींचा अनुशेष पहिल्यांदा भरा, मग मेगा भरती करा. मराठ्यांवर अन्याय होऊन नये, पण ओबीसींची भरती थांबायला नको, ओबीसींच्या मागण्यांवर वडेट्टीवारांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठ्यांवरही आगपाखड केली होती. मराठा नेत्याने समाजाचा मेळावा घेतला तर तो ओबीसीविरोधी ठरत नाही, मग ओबीसींचा मेळावा मराठा समाजाविरोधी कसा? असा प्रश्न वडेट्टीवारांनी केला होता. तसेच जर मेळावे घेणं चूक असेल तर निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मत मागताना लाज वाटत नाही का? असाही खोचक सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारला होता.