बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (07:47 IST)

हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि…,आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान

aditya thackeray
युवासेना नेते आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रा करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आदित्य ठाकरे हे मुंबईतील दहिसर भागात आले असता त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना बंडखोरांवर निशाणा साधला. फुटीर गटातही दोन गट आहेत. एक गट असा आहे की, ज्यांना जबरदस्तीने पळवून नेण्यात आलंय. मात्र, त्यांना परत यायचं आहे. काही जणांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहेत. थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना केलं आहे.
 
मला बंडखोरांना एकच निरोप द्यायचा आहे, जिथे गेला असाल तिथे आनंदी रहा. तुमच्या मनात आमच्याबाबत जसा राग, द्वेष आहे तसा आमच्या मनात नाहीये. मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की, तुमच्यात थोडी जर लाज उरली असेल, हिंमत उरली असेल… जिथे गेला असाल तिथे आनंदी रहा पण पुन्हा आमदार होण्यासाठी राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा आणि मग जनता जो कौल देईल, जो निकाल देईल तो मला मान्य असेल.