शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (11:05 IST)

गांधी कुटुंबावर टीका करण्याची हिंमत बाळगावी - हिमंता बिस्वा सर्मा

देशाने आता गांधी कुटुंबावर टीका करण्याची हिंमत बाळगावी असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी म्हटलंय
"लष्कराचा अपमान करणं किंवा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा लष्कराकडे पुरावा मागणे सर्वात मोठा गुन्हा आहे. राहुल गांधीबाबत मी बोललो तर तेलंगनाच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टीका केली. पण लष्कराचा अपमान केला तेव्हा ह्यांनी ट्वीट का केलं नाही." सर्मा यांनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्टीकरण दिलं. 
 
काही दिवसांपूर्वी सर्मा यांनी राहुल गांधींवर खालच्या पातळीची टीका केली होती. यानंतर त्यांच्यावर अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला.
 
सर्जिकल स्ट्राईक केल्याचा लष्कराने पुरावा द्यावा असं राहुल गांधी म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना सर्मा म्हणाले, "राहुल गांधी हे माजी पंतप्रधान राजीव यांचे चिरंजीव आहेत याचा पुरावा कधी त्यांच्याकडे मागितला आहे का?"
 
आता पुन्हा एकदा हिमंता सर्मा यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला. "गांधी कुटुंबाला तुम्ही काही बोलू शकत नाही ही मानसिकता या देशातून जायला हवी. त्यांनी लष्कराचा अपमान केला. दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्यावर टीका केली. पण तरीही गांधी कुटुंबाबाबत कोणी काहीही बोलत नाही."