रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (13:41 IST)

'निवडणूक लढवायची आहे, तर 10 झाडे लावाच'

निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या उमेदवाराने त्याच्या मतदारसंघात किमान 10 झाडे तरी लावावीत. अन्यथा त्याला निवडणुकीसाठी अर्जच भरता येणार नाही, असा प्रस्ताव विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडला आहे.
 
वातावरणातील बदल व ग्लोबल वॉर्मिंग या संदर्भात विधानभवनात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (22 सप्टेंबर) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
 
या बैठकीत वृक्षारोपणासाठीचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव निंबाळकर यांनी राज्य सरकारसमोर मांडला.