गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (21:31 IST)

इगतपुरी: विपश्यनेसाठी आलेल्या 37 वर्षीय तरुणाचा कृत्रिम तळ्यामध्ये आढळला मृतदेह

death
इगतपुरी - इगतपुरी येथील धम्मगिरी विपश्यना विद्यापीठात विपश्यना करण्यासाठी आलेल्या 37 वर्षीय तरुणाचा मृतदेह तेथील एका कृत्रिम तळ्यामध्ये मंगळवारी आढळून आला आहे.
 
ह्याबाबत माहिती मिळताच व्यवस्थापक गोविंद शंकर वाणी रा. इगतपुरी यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि पोलीस पथकाने चौकशी कार्यवाही सुरु केली. अमोल देविदास गंगावणे असे मयत युवकाचे नाव असून तो पाण्याच्या टाकीजवळ, शिक्षक कॉलनी, सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर येथील मुळ रहिवासी आहे.
 
इगतपुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून ह्या घटनेबद्धल अधिक तपास सुरु केला आहे.
 



Edited By - Ratnadeep Ranshoor