शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (21:30 IST)

‘शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे’लघुपट विधीमंडळात प्रदर्शित

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेला ‘शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे’, हा लघुपट विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात लोकप्रतिनिधींना दाखविण्यात आला.
 
मराठी भाषा विभागाच्यावतीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी हा लघुपट तयार करण्यात आला आहे. नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग तीन दिवस हा लघुपट दाखविण्यात आला होता. याचवेळी पत्र मोहीम राबविण्यात आली होती. साडेदहा हजार पत्रे राष्ट्रपतींना पाठविण्यात आली. आपली मराठी अभिजात कशी आहे, याची सर्वांना कल्पना यावी, यासाठी हा लघुपट तयार करण्यात आला आहे.
 
यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्यासह आमदार, अधिकारी उपस्थित होते. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा लघुपट तयार करण्यात आला आहे.