बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:31 IST)

महाराष्ट्रात 14.85 टक्के लोकसंख्या गरीब

राष्ट्रीय नीती आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या गरिबी निर्देशांक अर्थात पॉव्हर्टी इंडेक्सची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक गरीब लोकसंख्या बिहारमध्ये (51.91 टक्के) राहाते.
बिहारखालोखाल या यादीमध्ये झारखंड (42.16 टक्के) आणि उत्तर प्रदेश (32.67 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो.
सर्वाधिक गरीब लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 17 वा लागतो. महाराष्ट्रातील एकूण 14.85 टक्के लोकसंख्या गरीब असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
सर्वांत कमी गरीब लोकसंख्या केरळमध्ये असून तिथे अवघे 0.71 टक्के नागरिक गरीब आहेत.