शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (16:23 IST)

पुण्यात लग्नास नकार दिल्याने सर्वांसमोर महिलेचा फाडला गाऊन; मग -

लग्नास नकार दिल्याने अश्लिल शिवीगाळ करणार्‍याला महिलेने जाब विचारला. तेव्हा त्याने दारुच्या नशेत सर्वांसमोर महिलेचा गाऊन फाडून विनयभंगकेला.
 
याप्रकरणी वानवडी पोलिसांनीविकी जगदीश साळवी (वय 35, रा. वानवडी) याला अटक केली आहे.याप्रकरणी एका 35 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.ही घटना 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपीला लग्नास नकार दिला आहे.त्यामुळे आरोपी हा फिर्यादीला वारंवार शिवीगाळ करुन अश्लील शेरेबाजी करत असतो.
 
यावेळी  विकी दारुच्या नशेत आला व त्याने या महिलेला पुन्हा सर्वांसमोर शेरेबाजी सुरु केली.तेव्हा या महिलेने त्याला तु मला सारखी शिवीगाळ का करतोस,तुझा माझा काय संबंध,असे विचारले. तेव्हा त्याने सर्वांसमोर फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन त्यांचा गाऊन फाडून विनयभंग केला. पोलिसांनी विकी साळवी याला अटक केली आहे.