बॉम्बच्या धमकीनंतर इंडिगो विमानाची नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग
कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर मंगळवारी नागपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे विमान मस्कतहून कोचीमार्गे दिल्लीला जात होते. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले आहे आणि आतापर्यंत विमानातून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.विमानात प्रवासी आणि क्रू मेम्बर्ससह 157 जण होते.
इंडिगोचे विमान कोचीहून दिल्लीला मंगळवारी सकाळी 9:20 वाजता नुकतेच उड्डाण घेत असताना पायलटला विमानात बॉम्बची धमकी मिळाली असून त्याने नागपूर विमानतळ एसटीएसशी संपर्क साधला आणि आपत्कालीन विमान लँडिंग करण्याची परवानगी मागितली.परवानगी मिळाल्यावर नागपूरच्या विमानतळावर विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.
नागपूरचे डीसीपी म्हणाले, विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून सुरक्षा एजन्सीकडून विमानाची कसून तपासणी केली असून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
सध्या सुरक्षा अधिकारी विमानाची कसून तपासणी करत आहेत आणि प्रवाशांशीही बोलून माहिती गोळा केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.पोलिसांसह बॉम्ब पथकाचा तपास सुरु आहे.
Edited By - Priya Dixit