बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मार्च 2022 (20:58 IST)

मुख्यध्यापिकेकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, गुन्हा दाखल

Inhuman beating of students by headmistress
नाशिकमधील जेलरोड परिसरात असणाऱ्या स्कॉटीश अकॅडमी या इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापकाने दहावीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिला मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 
काही विद्यार्थ्यांकडून वर्गाची काच फुटली. त्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापकाने वर्गातील पाच ते सहा मुलांना काठीने जबर मारहाण केली. इतकंच नाही तर विदयार्थ्यांकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. मुख्याध्यापकांशी चर्चेला गेलेल्या पालकांच्या हातातले मोबाईलही शाळेने हिसकावून घेतले, आणि आताच्या आता पाच हजार रुपये भरून द्या असं फर्मान सोडलं.याविरोधात पालकांनी पोलिसात धाव घेतली.
 
पोलिसात गेला तर मुलांचं दहावीचं वर्ष वाया घालवून अशी धमकी दिल्याचंही पालकांनी म्हटलं आहे. त्यामुळे काही विद्यार्थी पोलिसात तक्रार देण्यास घाबरत असल्याचंही पालकांचं म्हणणं आहे.  विद्यार्थ्यांच्या हातावर, पोटावर आणि डोक्याने काठीने इतकी मारहाण केली आहे की मुलांच्या अंगावर वळ उठले आहेत, असं पालकांनी म्हटलं आहे.विशेष म्हणजे या शाळेविरुद्ध आतापर्यंत 15 ते 20 तक्रारी दाखल झाल्या आहेत, पण शाळेवर एकही कारवाई झालेली नाही.