सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 17 जून 2023 (11:12 IST)

Ayodhya Paul: ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक

ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक केल्याची घटना कळव्यात घडली आहे. 
 
शाईफेक केल्यानंतर अयोध्या पोळ यांनी स्वतः ही माहिती फेसबुकवर पोस्ट करत दिली. पोळ या एका कार्यक्रमात आल्या असताना काही जणांनी त्यांना घेरून शाईफेक केली. त्यांनी फेसबुक पोस्ट करून ही माहिती दिली. त्यांनी लिहिले "आजोळी आले अन सन्मान झाला",
शिवसेनेच्या हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना अयोध्या पोळ यांनी आव्हान दिल्यामुळे पोळ चर्चेत आल्या होत्या. पोळ या मूळच्या परभणीच्या आहे. त्यांना शिवसेनेचं बाळकडू लहानपणापासूनच मिळालं आहे. त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केले. त्यांनी पदवी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे. त्यांच्या मातोश्री गंगुबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या. 

कळव्यातील मनीषा नगर येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त ठाकरे गटाकडून कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास सुषमा अंधारे, खासदार राजन विचारे आणि जिल्हा अध्यक्ष केदार दिघे हे देखील कार्यक्रमास उपस्थित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पोळ यांनी सर्व महापुरुषांच्या फोटोला हार घालताना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शेवटी हार घातल्यामुळे संतप्त महिलांनी पोळ त्यांच्यावर शाईफेकत मारहाण केली. या प्रकरणी ठाकरे गटा कडून कारवाई करण्याची मागणी करत आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit