सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (20:21 IST)

नाशिकच्या काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी मोदींना निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मोदींनी अतिप्राचीन काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. नाशिक दौऱ्याचे औचित्य साधून या काळात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे. याबाबत काळाराम देवस्थानचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी ही माहिती दिली आहे.
 
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिक ओळखले जाते. नाशिकचे श्री काळाराम मंदिर प्रमुख मंदिर मानले जाते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर जेथे त्यांनी वास केला होता. त्यामुळे या मंदिराला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याआधी मोदींनी अतिप्राचीन काळारामचे दर्शन घेण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. 12 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा नाशिकमधे येणार आहेत त्या दिवशी त्यांनी काळारामचे दर्शन घेण्याची विनंती करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक मेळावाचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही फोडणार आहेत. या महोत्सवाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देण्यात आली आहे.  
 
Edited by -Ratnadeep Ranshoor