मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 4 जुलै 2021 (15:47 IST)

शिवसेना-भाजपमध्ये काही शिजत आहे? संजय राऊत भाजप नेत्याला भेटल्यानंतर म्हणाले

शिवसेना नेते संजय राऊत आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात राजकीय अटकळांचे बाजार तापले आहे. वेगवेगळ्या अनुमानांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपले मौन तोडले असून शेलार यांच्याशी झालेल्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. राऊत म्हणाले की आम्ही एका सामाजिक कार्यक्रमा दरम्यान भेटलो.
 
राऊत म्हणाले- मी केवळ सामाजिक मेळाव्यात आशिष यांना भेटलो आहे. महाराष्ट्राचे राजकारण भारत आणि पाकिस्तानसारखे नाही.राजकीय मतभेद असूनही आम्ही एकत्र राहतो.ज्यांना मी आवडत नाही असे काही लोक उद्याच्या विधानसभा अधिवेशनापूर्वी अफवा पसरवत आहेत. यापूर्वी आशिष शेलार यांनी अशी कोणतीही बैठक नाकारली होती, परंतु त्यांच्याच पक्षाच्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या बैठकीला ‘सद्भावना बैठक’ असे संबोधून या विषयावर स्पष्टीकरण दिले होते. 
 
हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या विधानसभा निवडणुका नंतर भाजप-शिवसेनेचे संबंध चांगले चालले नाहीत. विशेषत: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक स्कार्पियो सापडली असल्याने भाजपला शिवसेना सरकारवर हल्ला करण्याची चांगली संधी मिळाली आहे. एनआयए, सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयासारख्या केंद्रीय संस्थांकडून महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध तपासांमुळे शिवसेनेच्या नेत्यांची झोप उडाली आहेत.
 
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जवळीक वाढवण्याचे आवाहन केले होते. अशा परिस्थितीत भाजप विरोधात बोलणारे संजय राऊत यांची आणि आशिष शेलारच्या झालेल्या बैठकीवरून अंदाज लावण्यात आले.