सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाहीत - धनंजय मुंडे
"सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाहीत. चळवळ चांगली केली, तर चळवळीतून प्रश्न मार्गी लागतात," असं मत धनंजय मुंडे यांनी खासदार संभाजीराजे यांच्या विधानावर व्यक्त केलं आहे.
"मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रिपदी बसवा," असं खासदार संभाजीराजे बीडमध्ये बोलताना म्हणाले होते.
काल (3 जुलै) बीडमधील परळीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंना बरेच प्रश्न विचारले.
या प्रश्नांनंतर आक्रमक झालेल्या संभाजीराजेंनी म्हटलं, "तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही."
'मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मला मुख्यमंत्री करा,' असं संभाजीराजे म्हणाले.