राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हेच शिकवलं जातं का? रिधा रशीद यांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपा महिला मोर्चा महामंत्री रिधा रशीद यांनी विनयभंगाचा आरोप केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी याला विनयभंग म्हणतात का? असा सवाल उपस्थित केला. यावर तक्रारदार रिधा रशीद यांनी सोमवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हेच शिकवलं जातं का? असा सवाल केला.
रिधा रशीद म्हणाल्या, “मी सुप्रिया सुळेंना विचारेन की, ज्या पद्धतीने माझ्याशी घटना घडली तीच परंपरा आहे का? ते असंच महिलांना ढकलून देत बाजूला लोटता का? त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असंच होतं का? हेच शिकवलं जातं का? यावर महाराष्ट्र महिला आयोग काय भूमिका घेते हेही मला पाहायचं आहे. ते माझ्या बाजूने कधी भूमिका घेतात याची मी वाट पाहते आहे.”
Edited By - Ratnadeep Ranshoor