शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (14:47 IST)

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती

supriya sule
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असून राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे अशी थेट टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे.
 
आज ३९ दिवसानंतर शिंदे सरकारच्या १८ लोकांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची आठवण भाजपला करुन दिली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात मात्र आज राज्यात मंत्रिमंडळाच्या झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.