गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जुलै 2021 (08:13 IST)

जळगाव जिल्हा लवकरच अनलॉक होणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात लागू केलेल्या निर्बंधामध्ये आणखी शिथिलता मिळावी अशी मागणी नागरिक, व्यापाऱ्यांकडून वारंवार होत आहे. जिल्ह्यातील कोरोनातील सकारात्मक रुग्णांची आकडेवारी गेल्या आठवडाभरात १० च्या आतच आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासनाला जिल्हा अनलॉक करण्याची मागणी केली आहे.
 
जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र कोरोना बाबतचे नियम आणि निर्बंध काही शिथील होत नाही. नागरिकांना हे नियम शिथिल होण्याची आस लागली आहे. त्यातच जिल्ह्यातील नागरिकांना एक आनंदाची वार्ता मिळाली आहे. ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील नियम शिथील करून जळगाव जिल्हा अनलॉक करावा असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राज्य शासनाला दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.