1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (23:19 IST)

जम्मू-काश्मीरः मानकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत खाण स्फोट, एक जवान शहीद, एक जखमी

mine-blast
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील मानकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत खाण स्फोट झाला आहे. या स्फोटात एक जवान शहीद झाला आहे. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुंछ जिल्ह्यातील मानकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ खाण स्फोट झाला. यात सैन्याचा एक सैनिक शहीद झाला आहे. शहीद जवानची ओळख 27 वर्षीय कमल वैद्य अशी आहे. कमल हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. या अपघातात एक जवानही जखमी झाला आहे. ज्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.