शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (20:13 IST)

ICSE, ISC Result 2021 : दहावी व बारावीचे निकाल जाहीर; महाराष्ट्राचा १०० टक्के निकाल!

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बोर्डानं ISCE आणि ISC च्या दोन्ही परीक्षा रद्द केल्या होत्या. मात्र विशेष मूल्यांकन पद्धतीनं आज म्हणजेच २४ जुलैला ISCE आणि ISC बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल (ICSE, ISC Result 2021) जाहीर करण्यात आला आहे.
 
दहावीचा निकाल ९९.९८ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.७६ टक्के इतका लागला आहे. दहावीचा निकाल नववीचे गुण आणि दहावीच्या अंतर्गत गुणांच्या मुल्यांकनावर लावण्यात आला आहे. तर बारावीचा निकाल ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षेतील गुणांवर आधारित आहे.
 
ICSE दहावीच्या परीक्षेसाठी २ लाख १९ हजार ४९९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख १८ हजार ८४६ मुलं, तर १ लाख ६५३ मुली होत्या. दुसरीकडे ISC बारावीच्या परीक्षेसाठी ९४ हजार ११ विद्यार्थी बसले होते. त्यापाकी ५० हजार ४५९ मुलं, तर ४३ हजार ५५२ मुली होत्या.
 
महाराष्ट्रात ICSE च्या २३४ शाळा आहेत. या शाळेतील २४ हजार ३५९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. तर ISC च्या एकूण ५३ उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळेतून ३ हजार ४२७ मुलं परीक्षेला बसली होती. त्यापैकी ९९.९४ टक्के मुलं पास झाली आहेत.