सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (14:44 IST)

दहावीचा निकाल लागला ! राज्यातील 99.95 टक्के विध्यार्थी पास

दहावीच्या परीक्षेचा निकाल कोरोना संकटाच्या पार्शवभूमीवर अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे लावण्यात आला आहे. आज (16 जुलै) ऑनलआईन पध्दतीने दुपारी एक वाजता ऑनलआईन पध्दतीने दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.राज्याचा एकूण निकाल विक्रमी म्हणजेच 99.95 टक्के लागला आहे. मुलांचा निकाल 99.93 टक्के इतका आहे,त्यामध्ये, कोकणच्या विभागाचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.ही  माहिती पुणे शिक्षण मंडळाची पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.

परीक्षेस राज्यातील पुणे,नागपूर,औरंगाबाद,मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 75 हजार 806 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यापैकी 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे त्यापैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.95आहे..
 
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 82 हजार 802 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यापैकी 82 हजार 674 विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे त्यापैकी 74618 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 90.25 आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (100%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (99.84%) आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94 % आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02 % नेजास्त आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 % लागला आहे.

एकूण 72 विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये 27 विषयांचा निकाल 100% टक्के लागला आहे. 2 राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्याथ्र्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 6 लाख 98 हजार 885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 218070 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 9356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील 22767 शाळांतून 16 लाख 58 हजार 614 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे.

सन 2021चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2020 च्या निकालाच्या तुलनेत 4.65% जास्त आहे.
खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 28424 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 97.45 आहे.9 शाळांचा निकाल शून्य टक्के