रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2024 (10:07 IST)

जळगाव: रागाच्या भरात पोटच्या मुलाने वृध्द बापाचा केला खून !

murder
जळगाव  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून भुसावळ, चाळीसगाव तालुक्यात खुनाच्या घटना ताजी असतांना नुकतेच यावल तालुक्यात माझे लग्न करून द्या अशी मागणी करत विषयाकडे टाळाटाळ करत असलेल्या वृध्द बापाला पोटच्या मुलाने संतापाच्या भरात लोखंडी कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यात घडली आहे. पोलीसांनी संशयिताला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतन तानसिंग कोळी वय-७३ रा. पिळोदा ता. यावल असे मृत वध्दाचे नाव आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील पिळोदा येथे रतन कोळी हे पत्नी शुबाबाई कोळी आणि मुलगा देवानंद कोळी यांच्यासोबत वास्तव्याला होतो. नेहमीप्रमाणे रविवारी १४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता घरी झोपलेले असतांना मुलगा देवानंद कोळी याने माझे लग्न लावून देत नाही, किंवा लग्नासाठी पैसे देत नाही असे वडील रतन कोळी यांना सांगून वाद घातला. याकडे वडील रतन कोळी यांनी टाळाटाळ केली.

याचा राग असल्याने संतापाच्या भरात घरात असलेली लोखंडी कुऱ्हाडीने झोपलेले असतांना वडील रतन कोळी यांच्यावर वार करून खून केला. ही घटना घडल्यानंतर पिळोदा गावात खळबळ उडाली होती. यावेळी पतीचा खुन केल्याचे पाहून शुबाबाई यांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी देवानंद कोळी याला अटक करण्यात आली.
 
यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शबाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा देवानंद कोळी याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिळोदा गावात घटनास्थळी फैजपुरच्या डीवायएसपी अन्नपुर्णा सिंह यांच्यासह पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पोलीस पथकाने भेट दिली असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor