रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मार्च 2020 (11:35 IST)

जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटाचा मुख्य सूत्रधाराला अटक

गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनाला जांभूळखेडा इथं घडवण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटाचा मुख्य सूत्रधार दिनकर गोटा याला गडचिरोली पोलिसांनी  अटक केली. त्याच्यासोबत कोरची दलमची महिला नक्षली सुनंदा कोरेटी हिलाही अटक करण्यात आली आहे.
 
गोटावर १०८ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यात ३३ गुन्हे हत्येचे आहेत. गेल्या वर्षी  एक मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या  स्फोटात गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान आणि एक खाजगी वाहनचालक शहीद झाले होते.